एक चित्ता सिगरेट पित असतो..

तेवढ्यात एक उंदीर समोर येतो आणि चित्त्याला म्हणतो,

"मित्रा,
माझ्या बांधवा,
सोड हि नशा,
बघ हे जग किती सुंदर आहे..
चल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा..!

चित्ता थोडा वेळ विचार करतो आणि उंदरासोबत चालायला लागतो........

पुढे हत्ती ड्रग्ज घेत बसलेला असतो..
त्याला सुद्धा पाहून उंदीर म्हणतो,

"मित्रा,
माझ्या बांधवा,
सोड हि नशा,
बघ हे जग किती सुंदर आहे..
चल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा..!

हत्ती सुद्धा थोडा वेळ विचार करतो आणि उंदरासोबत चालायला लागतो.......

थोडं पुढे गेल्यावर एक सिंह विस्की चा पेग भरत असतो..­

त्यालाहि पाहून न घाबरता उंदीर त्याला म्हणतो,

"मित्रा,
माझ्या बांधवा,
सोड हि नशा,
बघ हे जग किती सुंदर आहे..
चल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा..!

सिंह उठतो..
त्याचा ग्लास बाजूला ठेवतो..
आणि उंदराच्या ७/८ कानाखाली लगावतो ..

हे पाहून हत्ती आणि चित्ता सिंहाला म्हणतो "अरे उंदीर चांगले सांगतोय, का मारतोस त्याला ?? "

सिंह म्हणतो,

हा हरामखोर जेव्हा भांग पितो तेव्हा अशी बडबड करतो,
याने या आधी मला ४ वेळा पूर्ण जंगल फिरवलं आहे असंच भांग पिऊन

Share: